अबबब… संजय राऊतांवर चालू आहेत तब्बल ‘एवढे’ खटले, वाचा, नेमकं म्हटलंय राऊतांनी

मुंबई :

शिवसेना सध्या मवाळ भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने तसेच एका अभिनेत्रीने मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत अरे-तुरे भाषा केली होती. प्रचंड आक्रमक असणारी शिवसेना या प्रकरणी मात्र मवाळ भूमिका घेत होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना विचारले असता ‘जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू. विसरलेलो नाही. आमचा अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे’, असे उत्तर राऊतांनी दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेना कुमकुवत झालेली नाही. शिवसेना सत्तेत आहे. आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आमचे लोक खूप रागात आहेत. आम्ही आधीही सांगितलं की, जेव्हा विरोधी बाकांवर होतो, तेव्हा एका इशाऱ्यावर लोक रस्त्यावर उतरत होते. जे वाटेल ते आम्ही करायचो. माझ्यावर १४० पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाही. पुढेही घाबरणार नाही.

जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू, असा इशारा यावेळी बोलताना राऊत यांनी दिला.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here