भाजपला मोठा झटका; ‘त्या’ राज्यातील आमदारांनी गाठली थेट दिल्ली

भाजप म्हणजे दिल्लीतून लादलेल्या मुख्यमंत्र्यांचा पक्ष अशीच ओळख बहुसंख्य ठिकाणी बनली आहे. त्याला यशही येत होते. मात्र, आता त्रिपुरा नावाच्या राज्यातील भाजप आमदारांनी असे मान्य नसल्याचा संदेश देणारे कृत्य केले आहे.

आपल्या दुतोंडी वक्तव्यांसाठी आणि पुराणातील वांगी आताच्या काळात जोडून दाखले देऊन मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या विरोधात आमदारांनी एकी केली आहे. उलटसुलट वक्तव्य करून पक्षाचा जनाधार कमी करण्यासह करोना संकटात मुख्यमंत्री कमी पडल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी केला आहे.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांची टीम दिल्लीत दाखल झालेली आहे. आरोग्यमंत्री सुदीप रॉय बर्मन हे या बंडखोर गटाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, बेताल वक्तव्य करण्यासह मुख्यमंत्र्यांनी हुकुमशाही पद्धतीने कारभार हाकला आहे. परिणामी अनेक आएएएस आणि आयपीएस अधिकारी राज्यातून बाहेर पडत आहेत.

एकूणच या ६० आमदारांच्या राज्यात मोठे बहुमत असूनही भाजपला आता मोठा झटका बसला आहे. जनाधार नसलेले आणि काहीबाही वक्तव्य करणारे नेतृत्व दिल्याने काय होऊ शकते हे त्रिपुरा या राज्यात पुन्हा एकदा भाजपला दिसत आहे. पक्ष यातून काय बोध घेणार आणि कार्यपद्धतीत कोणता बदल करणार याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here