बिहारमध्ये ‘इतक्या’ जागांवर वाजणार सेनेची तुतारी; पहा काय नियोजन आहे पक्षाचे

भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचेमनसुबे ठेऊन ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवसेनेने आता बिहारमध्ये तुतारी फुंकण्याचे नियोजन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ५० उमेदवार देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

खासदार अनिल देसाई यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असे आहे, पण बिहारच्या सत्ताधारी जेडीयु पक्षाचे चिन्हीही बाण हेच असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला येथे तुतारी वाजवणारा माणूस अशी निशाणी मिळाली आहे.

निवडणूक चिन्ह कोणते मिळणार यावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे पक्षाने आता ताकद असलेल्या प्रमुख ५० ठिकाणी दमदार उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी २२ स्टार प्रचारकांची यादी तयार आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here