मोहटादेवी देवस्थानाने नवरात्रोत्सवाबद्दल घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक नवरात्रोत्सव रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय मोहटादेवी देवस्थानाने (पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी घेतला आहे.

जिल्हा न्यायाधीश अशोक भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी यावर चर्चा करून शासनाचे सर्व नियम पाळण्याचे ठरले आहे. त्यानुसार शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाकडून सुधारित आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही ठरले आहे.

या बैठकीस तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, आगार प्रमुख महेश कासार, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, विश्वस्त अ‍ॅड. विजय वेलदे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, आजिनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.

घटस्थापना सप्तशती पाठ, होमहवन, नित्य महापूजा असे सर्व विधी जमावबंदीचा आदेश पाळून होणार आहेत. कावडी यात्राही प्रतिकात्मक होऊन मुखवटा मिरवणूक देवस्थानच्या वाहनातूनच निघेल. त्यानंतर घटस्थापना होईल.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here