येते ४-५ दिवस महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होणार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; वाचा, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई :

महाराष्ट्राला सध्या परतीच्या पावसाने झोडपलं आहे. अतिवृष्टी आणि मौसमी पावसाने बेहिशेबी नुकसान केले आहे. आता काही पिके काढणीला आलेली होती, त्या पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची लागण करणे शक्य नाही. अशातच येत्या चार पाच दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भासह कोंकणातील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती  हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली आहे.

पुढील आठवड्यात 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह इतरही ठिकाणी पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितला आहे.   

पुढे बोलताना त्यांनी ‘या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होण्याची शक्यता आहे’, असे स्पष्ट केले. मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पिके लागणी होणे गरजेचे होते मात्र कधीही बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके लागण शेतकऱ्यांनी थांबवली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here