PUBG चाहत्यांसाठी गुड न्यूज; ‘या’ कंपनीच्या साथीने पुन्हा भारतात येण्याची तयारी

मुंबई :

सुरक्षिततेच्या कारणावरून केंद्र सरकारने अनेक शेकडो अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये tiktok तसेच Pub-G सारखे लोकप्रिय अॅप्ससुद्धा होते. बंदी घातल्यावर या अॅप्सला पर्याय सुद्धा आले मात्र त्या अॅप्सविषयी लोकांमध्ये असलेली लोकप्रियता अजूनही टिकून आहे. महाराष्ट्र टाइम्स ने ntrackr च्या रिपोर्टच्या हवाल्याने सांगितले आहे की, पबजी मोबाइल टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या मदतीने भारतात पुन्हा एकदा परतणार आहेत.

कोट्यावधी चाहते आणि वापरकर्ते असलेल्या Pub-G ला बंदी घातली गेल्यावर मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. टेलिकॉम कंपनी एअरटेलची साथ घेऊन मोठा कमबॅक Pub-G लवकरच करू शकते.

अशी आहे Pub-G ची लॉकप्रियता :-

Pub-G लाँच झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांत या गेमचे १० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते. आजच्या घडीला ही गेम पुन्हा लाँच केली तर यापेक्षा अधिक वेगाने दुप्पट डाउनलोड होतील, इतके चाहते या गेमचे आहेत.

संपादन : विनोद्कुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here