News18 India आणि Zee News वर ‘या’ बहुजन समाजाच्या संघटनेने ठोकला १०० कोटींचा दावा; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

सध्या प्रसारमाध्यमांच्या एकांगी भुमिकेवरून अनेक वाद-विवाद सुरु आहेत. तसेच टीआरपी मध्येही घटला केल्याप्रकरणी काही वृत्तवाहिन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आता अशातच देश पातळीवर काम करणारी एका मोठ्या बहुजन समाजाच्या संघटनेने News18 India आणि Zee News या २ वृत्तवाहिन्यांवर १०० कोटींचा दावा ठोकला आहे. मानहानी केल्यामुळे हा दावा केला असल्याचे सांगितले जात आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्वीट करत सांगितले की, भीम आर्मी बहुजन समाजाचा गौरव आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी News18 India आणि Zee News या वृत्तवाहिन्यांनी भीम आर्मीला विदेशी फंडिंग मिळाली असल्याची खोटी बातमी दाखवली. नंतर ईडीने मात्र असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. आता आम्ही त्यांच्यावर केस करणार आहोत. त्यांना नोटीस पाठवली आहे.

आता स्वाभिमानाशी कुठल्याच प्रकारचा समझोता केला जाणार नाही, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. हाथरस प्रकरणात आझाद यांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली होती. सर्वात आधी हाथरस प्रकरणावरून हल्लाबोल करणारे आझाद होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here