गुड न्यूज : ‘ही’ बँक देणार CSC द्वारे ग्रामीण व निमशहरी भागासाठी मोठे कर्ज; वाचा स्कीमची अधिक माहिती

कर्जप्रकरणे करायला तुम्ही शहरी भागात राहत असल्यास प्राधान्य असे बऱ्याचदा बँक अधिकारी सांगतात. होय, तशीच प्रथा आहे. किंवा शहरी भागापासून किती अंतरावर गाव आहे त्यावर कर्ज देण्याचे ठरवणाऱ्या बँका आता ग्रामीण भागालाही लक्ष्य करीत आहेत.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने यासाठी एक खास स्कीम आणली आहे. चालू सणासुदीच्या कालखंडात HDFC बँकेच्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये निमशहरी आणि ग्रामीण भागातील व्यावसायिक व ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

कॉमन सर्विस सेंटर (CSC) यांच्या सहकार्याने फेस्टिव ट्रीट्स योजना ही बँक सुरू करीत आहे. देशभरातील एक लाखांपेक्षा जास्त गावांना याद्वारे कर्जाचा पुरवठा होणार आहे. यामध्ये होम लोन, टू व्हीलर लोन, कार लोन, ट्रैक्टर लोन, गोल्ड लोन आणि बिजनेस ग्रोथ लोन देण्याचे नियोजन आहे.

HDFC बँक स्कीममधील मुद्दे :

व्याज दर : वार्षिक ५ ते १५ टक्के

दुचाकीसाठी शून्य प्रोसेसिंग फीद्वारे कर्ज

सहा महिन्यांसाठी डाऊन पेमेंट खूप कमी आणि २५ टक्के कमी ईएमआय

ट्रॅक्टर खरेदीसाठी ९० टक्के कर्ज

शेतकरी सोने तारण कर्ज आणि ट्रॅक्टर कर्ज याच्या प्रोसेसिंग फीमध्ये ५० टक्के सूट

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here