तर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल; ‘त्या’ भाजप प्रवक्त्याची अर्वाच्य भाषेत टीका

मुंबई :

हाथरस प्रकरणावरून अजूनही देशात राजकारण सुरु आहे. कॉंग्रेस आणि भाजप आपापल्या भूमिका या प्रकरणात मांडत आहेत. अशातच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कॉंग्रेसवर थेट नाव न घेता अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. ‘या प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासणी झाल्यावर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही’, असे म्हणत वाघ यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

वाघ यांनी ट्वीट करत म्हटले की, सतत तोंडावर पडत असुनही निर्लज्ज सेक्युलर गॅंगचे पिसाळलेले कुत्रे ज्या पध्दतीने हाथरस केस संबंधात एकसुरात भुंकत होते तेव्हाच संशय आला की हे प्रकरण फार वेगळे आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासणी झाल्यावर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

वाघ यांनी या भाषेत केलेल्या टीकेमुळे त्यांना लोकांनी ट्रोल केले आहे. अनिकेत मोरे यांनी म्हटले आहे की, बघा रे लोकांनो हा आहे जगातल्या सर्वात मोठ्या पार्टी चा प्रवक्ता, ही ह्याची भाषा !!भाजपने ह्याच्यात काय गुण बघितले काय माहीत, एका मवाली सारखी भाषा आहे ह्याची…  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here