‘त्या’ मुद्द्यावरून पुन्हा संभाजीराजे – वडेट्टीवार आमने-सामने; वाचा, काय घडलं प्रकरण

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा आणि धनगर आरक्षणाची चर्चा जोरात चालू आहे. यावरून विविधपक्षीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. मराठा आरक्षणावरून पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे आणि ओबीसी नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात काही दिवसांपासून जुंपली आहे. ‘ओबीसीमध्ये मराठा समाजाला का समाविष्ठ करत नाही, असे मी खासगीमध्ये सुद्धा बोललो नाही. ओबीसीसाठी 27 टक्के कोटा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, असे मी संभाजीराजे यांना खासगीमध्ये सुद्धा बोललो होतो. पण राजेंचा गैरसमज झाला. त्यातून ते बोलले. पण ते जे बोलले ते अर्धवट बोलले, याचा खेद वाटतो’, असे म्हणत वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंवर नाराजी व्यक्त केली आहे.

मी ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी कधीही ओबीसी समाजाचे वाईट होऊ देणार नाही. त्यासाठी मंत्रिपद गेले तरी मी मागेपुढे पाहणार नाही. जी लढाई मी ओबीसीसाठी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असल्याची शंकाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here