आम्हीपण तुमचे बाप आहोत; ‘या’ भाजप नेत्याचा अजित पवारांना टोला

पुणे :

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपने बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे.मागील निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचा प्रभाव वाढला असल्याचे जाणवले. नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिकेत प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. याच पार्श्वभूमीवर ‘पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत’, असा जिव्हारी लागणारा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना हाणला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here