अशी बनवा टेस्टी मेथी पुरी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आपण दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या पुऱ्या खात असतो. तिखट पुरी, पालक पुरी असे अनेक पुरीचे प्रकार आपल्याकडे आहेत. आज आम्ही आपल्याला टेस्ट मे बेस्ट असणाऱ्या मेथी पुरीची रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य घ्या मंडळीहो…  

पाचशे ग्रॅम मैदा

२ टेबलस्पून कसूरी मेथी

अडीच टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून जिरे

अर्धा टेबलस्पून क्रश केलेली काळी मिरी

पुऱ्या तळण्यासाठी तेल आणि चवीपेक्षा थोडे जास्त मीठ.

कृती वाचून घ्या मंडळीहो…

  • प्रथम एका भांड्यात तेल कोमट करावे. कोमट करून झाल्यानंतर एका परातीत मैदा घ्यावा (मैदा चाळून घ्यावा).
  • आता मैद्यात कोमट तेल, जिरे, मीठ, क्रश केलेली काळी मिरी घालून मिश्रण चांगले फेसून घ्यावे (पीठ फेसताना आतल्या गुठळ्या मोडून घ्याव्यात). मिश्रण चांगले फेसून झाल्यानंतर त्यात थोडे थोडे साधे पाणी घालून मीठ चांगले मळून घ्यावे.
  • पिठाचा गोळा तयार झाल्यावर त्यात कसूरी मेथी घालून पुन्हा चांगले मळून घ्यावे. आता पिठाच्या गोळ्याला २ तासांसाठी मुरवत ठेवावे. २ तासांनंतर पीठ पुन्हा हलके मळून घ्यावे.
  • आता पिठाचे साधारण गोळे तयार करून मोठ्या पोळ्या लाटून घ्याव्यात आणि साधारण एका छोट्या वाटीने गोल आकारात पुऱ्या कट करून घ्याव्यात. तयार गोल पुरीवर सुरीने किंवा फोर्कने टोचून घ्यावे म्हणजे पुरी फुलणार नाही.
  • आता तयार गोल पुऱ्या गरम तेलात मध्यम आचेवर बदामी आणि सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. खमंग आणि स्वादिष्ट कुरकुरीत मेथीच्या पुऱ्या तय्यार! या पुऱ्या चहाबरोबर छान लागतात.
  • संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here