अशी बनवा सर्वांची आवडती ‘क्रंची भेंडी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजकाल बदलत्या खाण्याच्या सवयीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रंची पदार्थ खायला आवडतात. क्रंची भेंडी खाणे म्हणजे शहरी पालकांसाठी जगातील सर्वात मोठे सुख आहे. कारण शहरातील लहान मुले जेवणात क्रंची भेंडी असेल तर स्वतः जेवायला बसतात. मन लावून जेवतात. अशी बनवा सर्वांची आवडती ‘क्रंची भेंडी’

साहित्य घ्या मंडळींहो… 

दहा-पंधरा भेंड्या

२ चमचे तिखट

१ चमचा हळद

अर्धा चमचा जिरेपूड

आवश्यकतेनुसार बेसन पीठ

अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट आणि सर्वात महत्त्वाचे चवीपुरते मीठ.
हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या की …
१) भेंडी स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. 

२) भेंडीचे देठ कापून पातळ उभे काप करा. 

३) वाटीत बेसन पीठ, तिखट, हळद, जिरेपूड आणि चवीपुरते मीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. 

४) भेंडीचे पातळ काप एका प्लेटमध्ये घेऊन त्याला आले-लसूण पेस्ट लावून घ्या.

५) त्यात बेसन पिठाचे मिश्रण घालून हाताने मिक्स करा. 

६) मिश्रण एकजीव करण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करू नये. त्याने भेंडीला कुरकुरीतपणा येत नाही.

७)  कढईत तेल गरम करा. मिश्रणात एकजीव झालेले भेंडीचे पातळ काप तेलात सुटे करून सोडा. 

८)मध्यम आचेवर भेंडीचे काप कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. 
झाली आपली गरमागरम आवडती ‘क्रंची भेंडी’ तयार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here