गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे; वाचून व्हाल आश्चर्यचकित

अनेक जुने लोक साखरेऐवजी गुळ खाण्यास पसंती देतात. साखर अनेक रोगांचे मूळ आहे म्हणून साखरेऐवजी सगळीकडे गूळ वापरावा. अगदी रोज कितीतरी वेळा चहा पिणाऱ्यांनी सुद्धा गुळाचा चहा प्यावा.

असे आहेत गुळाचे फायदे :-

1.गूळ खाल्याने पचनक्रिया सुधारते.

2.जर वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी गुळ फायदेशीर ठरतो.

3.गुळामध्ये कॅल्शिअम आणि लोह जास्त प्रमाणात असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

4.मासिकपाळी दरम्यान पोटदुखी होत असल्यास गूळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.

5.सांधेदुखीचा त्रास असेल तर 1 ग्लास दुधासोबत गूळ घेतल्यानं हाडं मजबूत होतात.

6.आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

7.गूळ शरीरातील हानिकारक टॉक्‍सिन बाहेर काढण्यास मदत करतो.

8.शरीरात हिमोग्लोबीन कमतरता असल्यास गूळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीन लवकर वाढते. त्यामुळे साखरपेक्षा गुळाला पसंती द्यायला हवी.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here