मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात ‘अशी’ झाली वृद्धी: चंद्रकांत पाटील

मुंबई :

देशाची राजकीय पटलावर कृषी विधेयकावरून गदारोळ माजला असताना भाजप अजूनही आपले कोडकौतुक करण्यात मग्न आहे. ‘मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे धान्य खरेदीमध्ये 48 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आपले वचन मोदी सरकारने पाळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि कृषी क्षेत्राचे उदारीकरण होत आहे’, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुढे त्यांनी सांगितले की, याशिवाय कृषी विधेयकामुळे शेतकरी आपले धान्य आता देशभरात कोठेही आणि स्वतः ठरवलेल्या किंमतीत विकू शकणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार असून धान्य खरेदीत आणखी वाढ होईल.

उत्पादनाचा खर्च कमी करणे, शेतमालाची योग्य प्रक्रिया आणि साठवणूक तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध झाल्यामुळे हे शक्य झाले आहे, असेही पाटलांनी स्पष्ट केले. एका बाजूला शेतकऱ्यांचे हाल हाल चालू आहेत. कृषी विधेयकाबाबत अजूनही शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. नेमकं हे विधेयक काय आहे, याची कुठलीही प्रत शेतकऱ्यांना आजवर मिळालेली नाही. सर्व विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना या विधेयकाच्या विरोधात असतानाही भाजप कृषी विधेयकावरून आपलीच टिमकी वाजवून घेण्यात व्यस्त आहे.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here