या महिन्यात पुन्हा वाढू लागल्यात सोन्याच्या किमती; वाचा, काय आहे कारण

मुंबई :

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. एकूणच सोन्याची भाव घसरल्यामुळे सोने खरेदी करण्यास मागील काही दिवसांत सुवर्णसंधी होती. आता मात्र सोन्याचे भाव चढू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेजीनंतर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीचे भाव सुद्धा वाढले आहेत.

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 51,322 रुपये झाले होते शुक्रवारी 236 रुपये प्रति तोळाने सोन्याचे दर वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,558 रुपये प्रति तोळा झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्याची स्पॉट प्राइज 236 रुपयांनी वाढली. डॉलरमध्ये आलेली कमजोरी, अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता त्याचप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेजी आली आहे, असं मत एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी व्यक्त केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here