भारतीय मुस्लिमांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भागवतांचे मोठे विधान; वाचा, नेमकं काय म्हटलंय त्यांनी

मुंबई :

हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्माचा प्रसार हे कार्य हाती घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय मुस्लिमांबाबत मोठे विधान केले आहे. जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे मत भागवत यांनी एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत मांडले, असे दैनिक प्रभातने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असेही पुढे भागवत यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी भारतीय मुस्लीम आणि पाकिस्तानमधील मुस्लीम यांच्यामधील फरक स्पष्ट करत पाकिस्तानवर टीका केली. ते म्हणाले की, भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला.

हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असणाऱ्या मोहन भागवतांनी भारतीय मुस्लिमांविषयी केलेले हे भाष्य पाहून इतर संघटनांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here