‘त्यावेळी’ सगळे अनलॉक होईल; पहा अहमदनगरमध्ये काय म्हटलेय आरोग्य मंत्र्यांनी

करोना विषाणू आला आणि भीतीपोटी काय करावे हेच समजत नसल्याने अवघे जग लॉकडाऊन करावे लागले. अशावेळी महाराष्ट्र सर्वप्रथम लॉक करण्याची कार्यवाही सरकारने केली होती. तोच लॉकडाऊन हळूहळू उघडला जात आहे. सहले अनलॉक होण्यासाठी मात्र नोव्हेंबर २०२० ची वाट पहावी लागेल असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथिल केलेले असतानाच संपूर्ण राज्य येत्या नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा मूळपासून नाश करणारी प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे पुढील काही दिवस आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार आहे. राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाईल. टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी सांगितले आहे की, आरटी पीसीआर टेस्टची किंमत आठशे रुपयांपर्यंत आणली असून केंद्र सरकारने याची किंमत साडे चार हजार रुपये ठरवली होती. पण ती आम्ही दोन टप्यात खाली आणली आहे. तसेच ती येत्या आठवड्यात आठशे रुपयांपर्यंत आणणारा असा सूतोवाच राजेश टोपे यांनी केला आहे. त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणलेल्या आहेत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here