‘त्यांचा’ बोलाविता धनी वेगळा आणि पैसे पुरविणारा वेगळा; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई :

प्रसारमाध्यमांच्या एकांगी भूमिकेवरून सध्या अनेक वादविवाद चालू आहेत. अशातच काही वृत्तवाहिन्यांवरती कारवाई होणार असल्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘मुंबईत बसून काही चॅनलवाल्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुख आणि माझ्याविरोधात गरळ ओकली. त्यांचा बोलाविता धनी वेगळा आणि पैसे पुरविणारा वेगळा आहे, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

बाकी गोष्टी पोलिस तपासात हे लवकर कळतीलच. मुंबई पोलिसांच्या कारवाईचे त्यांनी सर्वप्रथम कौतुक केले. आता अनेक गोष्टी बाहेर येतीलच, या कारवाईबाबत कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा उपचार आम्ही करू, असा सज्जड इशाराही राऊत यांनी दिला आहे.

घोटाळा उघड झाल्यावर अनेक जण गप्प का आहेत, असा प्रश्न करीत राफेल, थ्री जी, टु जी याप्रमाणे हा घोटाळा आहे. संबंधितांकडे पैसे कोठून आले, कोण पैसे वाटत होते, ड्रॅग रॅकेटमधून हे पैसे आले का?, असे अनेक प्रश्न समोर असल्याचे राऊतांनी सांगितले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here