थेट रोहित पवारांच्या मतदारसंघातून पडळकरांचा व्हिडीओ; पहा, काय म्हटले आहे पडळकरांनी

अहमदनगर :

मा. शरद पवार यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला देत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.

थेट त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची असलेली अवस्था दाखवत कामावर लक्ष देण्याचे सुचविले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील मोठे गाव असणारे मिरजगाव या गावात केलेल्या व्हिडीओत पडळकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा म्हणजे तुम्हाला तुम्ही किती खुजे आहात हे कळेल, असेही सुनावले आहे.

कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी अनेकदा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले दिलेले आहेत. यावरुन ‘आपल्या गावातील रस्ते नीट नसताना थेट देशाच्या नेतृत्वाला सल्ले देऊ नये’, असे पडळकरांनी सांगितले आहे.    

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here