भारतात ‘त्या’ महिला आहेत सर्वाधिक श्रीमंत; पहा फोर्ब्सच्या यादीत कोणाला मिळालेय स्थान

भारतातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर आता फोर्ब्स मासिकाने श्रीमंत भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये जिंदल या स्टील उत्पादक ग्रुपच्या सावित्री जिंदल यांनी पहिले स्थान पटकावले आहे. एकूण देशामध्ये त्या श्रीमंतीच्या बाबतीत १९ व्या क्रमांकावर आहेत.

स्टील, उर्जा, सिमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये काम करणाऱ्या जिंदाल समूहाच्या सावित्रीताई या सर्वेसर्वा आहेत. दिवंगत कॉंग्रेस नेते आणि हरियाणामधील मंत्री ओमप्रकाश जिंदल यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनीही यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये निवडणूक लढवली आहे. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी उद्योगावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

यादीमधील महिला उद्योजिका अशा :

  1. सावित्री जिंदल (जिंदल समूह)
  2. किरण मजूमदार शॉ (बॉयोकॉन)
  3. विनोद राय गुप्ता (हेवेल्स इंडिया)
  4. लीना तिवारी (यूएसवी इंडिया)
  5. मल्लिका श्रीनिवासन (टैक्टर्स एंड फॉर्म इक्विपमेंट लिमिटेड – टफे)

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here