राहुल गांधींनी टीका करत केला ‘तो’ सवाल; सीमेवरील जवानांची आहे ‘अशी’ अवस्था

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेदी केलेल्या ८४०० कोटींच्या विमानाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावरून मोदींवर समाजमाध्यमांमध्ये टीकाही करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या सैनिकांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि इकडे पंतप्रधान मोदीसाठी ८४०० कोटींचे विमान घेतले आहे.

हा न्याय आहे का? असा सवालही यावेळी राहुल गांधींनी केला आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी विमान आणि भारतीय सैन्य या मुद्द्यावरून मोदींला लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, पंतप्रधानांनी स्वतःसाठी ८४०० कोटींचे विमान खरेदी केले. एवढ्या पैशात सियाचिन-लद्दाख़ सीमेवर असणाऱ्या सैनिकांसाठी अनेक गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. पुढे राहुल यांनी थेट यादी आणि संख्याच देत सर्वाना चकित केले.

  1. गरम कपड़े: 30,00,000
  2. जैकेट, दस्ताने: 60,00,000
  3. जूते: 67,20,000
  4. ऑक्सिजन सिलेंडर: 16,80,000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here