प्रकाश आंबेडकर पुन्हा कडाडले; ‘त्यांनाच’ आम्ही राजे मानतो आणि….

मुंबई :

‘एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत’, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजांवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या त्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ‘राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो’, असे ट्वीट केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी या ट्वीटमध्ये भाष्य केले आहे. ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील. राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या ट्वीटला आता खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे कशा प्रकारे घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्वीटवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही प्रतिक्रिया समर्थन देणाऱ्या तर काही विरोधी मताच्या आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here