टीम कंगना यांची तोंडपाटीलकी नडली; शेतकरी आंदोलनप्रकरणी गुन्हा, पहा न्यायालयाने काय दिलेत आदेश

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या उलटसुलट वक्तव्यांनी सतत केंद्र सरकारची पाठराखण करणाऱ्या कंगना राणावत यांना आणखी एक धक्का बसला आहे. शेतकरी आंदोलकांना थेट दहशतवादी म्हणणाऱ्या कंगना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

वकील आणि शेतकरी पुत्र असलेल्या रमेश नाईक यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानुसार कर्नाटक राज्यातील तुकमुर जिल्ह्यातील प्रथम श्रेणीचे न्यायिक मजिस्ट्रेट (जेएमएफसी) यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यात कंगना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, कंगना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा कायद्याच्या ट्विटला प्रतिसाद देताना आपली भूमिका मांडली होती. त्यात कंगना यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री जी, कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने का अभिनय करे, ना समझने का अभिनय करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं. सीएए (संशोधित नागरिकता कानून) से एक भी इंसान की नागरिकता नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियां बहा दीं.

२० सप्टेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणण्याची तोंडपाटीलकी कंगना यांनी आणि त्यांच्या टीमने केली होती. त्यामुळे भावना दुखावल्याने नाईक यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. एका अर्थाने प्रत्येक ठिकाणी भाजप सरकारची पाठराखण करणाऱ्या कंगना यांच्या तोंडपाटीलकीने आता त्यांना पुन्हा एकदा अडचणीत आणि महत्वाचे म्हणजे चर्चेत आणले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here