शेळीपालन हा व्यवसाय सोन्याचे अंडे देणारी कोंबडी जरी नसला तरी कष्टकरी व जिद्दी महिला व तरुणांसाठी एक उत्तम व्यवसाय आहे. त्यामुळेच यामधून अधिकच्या अपेक्षा न ठेवता चिकाटीने हा व्यवसाय करावा. यशकथा पाहण्यासह वाचण्याची तसदी घेतानाच पूर्णपणे त्याला न भूलता आपल्या अभ्यास आणि अनुभवांवर या व्यवसायाचे नियोजन करावे. अशावेळी जातवान व खात्रीच्या शेळ्या आणि बोकड आपल्या कळपात असण्याची काळजी घ्यावी. तसेच कळपामध्ये बेणूचा बोकड सदृढ आणि निरोगी असावा. यासह एकाच कळपामध्ये पर्याय म्हणून आणखी एखादा बेणूचा (पैदाशीचा) बोकड ठेवावा.
अनेकदा असे होते की, शेळ्या लावणीला आलेल्या असतात. त्यावेळी आपला बेणूचा बोकड आजारी असल्यास मग आपल्याकडे पर्याय राहत नाही. अशा माजावर आलेल्या शेळ्या वेळेवर लावल्या न गेल्यास आर्थिक नुकसान होते. हेच टाळण्यासाठी एखादा पर्यायी बोकड कळपात असण्याकडे लक्ष द्यावे.
- बर्ड फ्ल्यू अपडेट : ‘हा’ भाग पॉझीटीव्ह म्हणून घोषीत; पहा तुमचा भाग तर यात नाही ना
- बर्ड फ्ल्यू अपडेट : कोणत्याही पक्षांची जास्तीची मर दिसली की तातडीने ‘हे’ करा; सरकारचे आवाहन
- बर्ड फ्ल्यूचा झटका; चिकनसह खाद्यतेलाच्या मार्केटवरही असा झालाय परिणाम
- Blog : माध्यामांनो, बर्डफ्लूवर शास्त्रोक्त बोला की काही..
- दिल्लीतील बर्ड फ्ल्यू स्ट्रेन वेगळाच; काळजी घ्या, वाचा महत्वाची माहिती
कळपातील बेणूच्या बोकडाबाबतचे काही महत्वाचे मुद्दे असे :
- साधारणपणे २० ते ३० शेळ्यांसाठी एक बेणूचा बोकड असावा.
- मात्र, त्याला पर्याय म्हणून आणखी एखादा बोकड शेळ्या लावण्यासाठी असण्याकडे लक्ष द्यावे.
- एका बोकडापासून दिवसाला जास्तीतजास्त ३ शेळ्या भरून घ्याव्यात म्हणजे लावाव्यात.
- जास्त शेळ्या जर एकाचवेळी माजावर आल्या तर एका बेणूच्या बोकडामध्ये त्या शेळ्या लावणे शक्य होत नाही. अशावेळी मग काहींचा माज चुकू शकतो. त्यासाठी पर्यायी बोकड कामाला येतो.
- अनेकदा आपण बेणूचा बोकड मोठा करतो मात्र, त्याचात शुक्राणू संख्या गरजेनुसार नसल्यास मग अशावेळी शेळ्या लावूनही काहीच फायदा होत नाही. असे लक्षात आले की असा बोकड तातडीने पशुवैद्यकीय तज्ञांना दाखवून घ्यावा.
- तसेच अशावेळी मग कळपातील शेळ्या लावण्यासाठी पर्यायी सोय म्हणून ठेवलेला बोकड वापरावा.
- शेळ्या माजावर असताना वेळेवर त्या भरल्या (लावल्या) गेल्या नाही तर, अशावेळी शेळीचा खाद्य व संगोपनाचा खर्च वाढतो. तोच टाळण्यासाठी म्हणून दोन पैदाशीचे बोकड कळपात असावे.
- पैदाशीचा बोकड १५ महिने वयाचा पूर्ण वाढ झालेलाच वापरावा. शेळ्या १९-२१ दिवसांनी माजावर येतात. अशावेळी त्यांना १० तासांनी बोकडाकडून भरून घ्यावे.
- नर हिवाळ्यात व पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक प्रजननशील असतात. त्याच काळात शेळ्याही जास्त प्रमाणात माजावर येतात.
- कळपातील बोकड हा निरोगी, भारदस्त आणि रुबाबदार असावा. त्याला सकस चारा व खुराक देऊन शेळ्या लावण्यासाठी तयार करावे.
अशा पद्धतीने शेळ्यांना भरून घेण्यासाठी पैदाशीच्या बोकडाकडे विशेष लक्ष द्यावे. हा नर आपल्या शेळीपालन व्यवसायातील प्रजनन वाढीचा महत्वाचा दुवा असतो. त्यामुळे तो जातवान आणि निरोगी असेल यावर कटाक्षाने लक्ष द्यावे.
(क्रमशः)
संपादन आणि लेखन : सचिन मोहन चोभे
वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव