धक्कादायक : म्हणून धोनीच्या मुलीलाच दिली रेपची धमकी; इरफानने दिले उत्तर

रसिक म्हणून काहीजण किती टोकाची भूमिका घेऊन शकतात हे या भारताने पुन्हा एकदा अनुभवले आहे. कारण, चेन्नई सुपर किंग्स हा संघ खेळाडू महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली दमदार खेळ करीत नसल्याने थेट धोनीच्या मुलीवर रेप करायची धमकी काहींनी दिली आहे.

होय, हे काही पाकिस्तान, लिबिया वा सिरीया या देशात घडलेले नाही. भारतात घडले आहे. त्याला खेळाडू इरफान पठाण याने आपल्या भारतीय स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, अशा पद्धतीने माथेफिरू आणि मानसिक रोगी असलेली मंडळी किती टोकाला जाऊ शकतात हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

धोनीची मुलगी फ़क़्त ५ वर्षांची चिमुरडी आहे. जीवा असे तिचे नाव आहे. सध्या चेन्नईची टीम ६ सामन्यात फ़क़्त २ मध्ये विजय मिळवू शकली आहे. सर्वाधिक फेव्हरेट टीम असेलल्या धोनीच्या या खेळाडूंच्या कामगिरीवर अनेकजण नाराज आहेत. ते साहजिक आहे. मात्र, त्यात थेट मुलीवर रेप करण्याची धमकी देणारे महाभागही आहेत. हे आपले दुर्दैव आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here