MPSC परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई :

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने २०० जागांसाठी MPSCची परीक्षा जाहीर केली होती. मात्र या परीक्षेला अनेक मराठा संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. तसेच या मुद्द्यावरून मराठा समाजाचे नेतेही आक्रमक झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, येत्या 11 तारखेला MPSC ची 200 जागांसाठीची परीक्षा नियोजित होती. पण गेल्या चार महिन्यांमध्ये शाळा, कॉलेज, अभ्यासिका वर्ग बंद होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं शक्य झालं झाली नाही. त्यांना अभ्यासासाठी अवधी मिळण्यासाठी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

२०० जागांसाठी होणारी ही परीक्षा यापूर्वीही २ वेळा पुढे ढकलण्यात आली होती. यावेळीही सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सह्याद्री अथितीगृहात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी ही माहिती दिली. यावेळी बैठकीला मंत्री अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here