पैसे कमावण्याची सुवर्णसंधी; अशी विका तुमच्याकडे असलेली जुनी नाणी, 5 आणि 10 रुपयांच्या नाण्याचीही होतेय विक्री

मुंबई :

जुनं ते सोनं असं आपल्याकडे सर्रास म्हटलं जातं. ते चूक की बरोबर हे मात्र काळानुसार ठरते. आता मात्र जुनं ते सोनं मानणाऱ्या लोकांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे. जुनी नाणी आता लोकांना पैसे मिळवून देत आहेत. अगदी ५ आणि १० रुपयांची नाणीसुद्धा विकली जात आहेत.  इंडियामार्टच्या वेबसाईवर या जुन्या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत. 

विशेष म्हणजे ज्या नाण्यांवर लक्ष्मीचा, वैष्णवी मातेचा आणि देवी देवतांचा फोटो आहे, अशी नाणी भरमसाठ किमतीला विकली जात आहेत. सध्या बाजारात या नाण्यांची मागणी वाढत आहे. अशी नाणी जवळ बाळगली की आपल्याकडे समृद्ध होतो, आपली भरभराट होते, अशी लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे या नाण्यांना मागणी तर आहेच आणि किंमत पण मोठी दिली जात आहे.

अगदी लाखो रुपये खर्च करून अशी नाणी विकत घेतली जात आहेत. तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here