‘ती’ गर्जना करणाऱ्या मोदींच्या तोंडातून आता एक शब्दही का निघत नाहीये?; महाराष्ट्र कॉंग्रेसचा सवाल

मुंबई :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर अस्थिर वातावरण आहे. सीमा प्रश्नांमुळे भारताला अनेक देशांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच चीन- भारत तणावा दरम्यान भारत सरकारकडून कडक पावले अद्यापही उचलण्यात आलेली नाहीत. तसेच भारताला जीवितहानीला सुद्धा सामोरे जावे लागले. हेच लक्षात घेत महाराष्ट्र कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. देशाची एक इंचही जमीन देणार नाही’ अशी गर्जना करणाऱ्या मोदींच्या तोंडातून आता एक शब्दही का निघत नाहीये?, असा रोकडा सवाल कॉंग्रेसने केला आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करत म्हटले आहे की, चीनची वाढती मुजोरी आणि पाकिस्तानचा काश्मीर मधील हस्तक्षेप मोदी सरकारला रोखता येईना झालाय. एवढंच नाही तर आजूबाजूचे लहानसहान देशही भारताला डोळे दाखवू लागलेत. ‘देशाची एक इंचही जमीन देणार नाही’ अशी गर्जना करणाऱ्या मोदींच्या तोंडातून आता एक शब्दही का निघत नाहीये?     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here