‘इतके’ दिवस अजून हटणार नाही महाराष्ट्रातील पाऊस; वाचा, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई :

आता मौसमी पाऊस कमी झाला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पिके लागणी होणे गरजेचे होते मात्र कधीही बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके लागण शेतकऱ्यांनी थांबवली आहे. अशातच राज्यात अजून आठवडाभर पाऊस मुक्काम करणार असल्याची माहिती हवामान खात्याचे अधिकारी के.एस. होसालीकर यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, सक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास 6 ऑक्टोबर पासून पुढे सरकला नाही. राज्यात पाऊस अजून आठवडाभर मुक्काम असण्याची शक्यता आहे.

काही काळासाठी उकाडा तर काही वेळासाठी पाऊस असे एकूण वातावरण आहे. विचित्र पद्धतीने बदलणाऱ्या वातावरणामुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे आणखी पाऊस होणार असल्याच्या शक्यता आहेत.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here