वांगे खा आणि ठणठणीत रहा; वाचा वांग्याचे आरोग्यदायी फायदे

घरी असेल तर मस्तपैकी केलेले टेस्टी वांग्याचे भरीत आणि हॉटेलमध्ये असेल तर चमचमीत बैंगन मसाला…

वांग्याचे खास करून पदार्थ आपण काही खात नाहीत. ठराविक एखादी तिखट भाजी, भरीत, बैंगन मसाला यापलीकडे आपण वांग्याचे पदार्थ आपल्या खाण्यात येत नाहीत. तुम्हाला माहित आहे का…? वांग्यामध्ये प्रथिने फायबर आणि क्षार हे मोठ्या प्रमाणात असतात आणि ते आपले शरीर ठणठणीत ठेवण्यात मदत करतात.

हे आहेत फायदे :-

१) कोलेस्टेरोल कमी करणारी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. 

२) वजन कमी करण्यासाठी या फळभाजीची मदत होऊ शकते. 

३) वांग्यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते जे शरीरामधील फ्री रॅडीकल कमी करण्यास मदत करते. फ्री रॅडीकल मुळे शरीरातील पेशींना नुकसान होत असते. 

४) त्याच बरोबर वांग्यामुळे कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते.

५) वांग्यामध्ये असलेले नॅसनीन हे अँटी ऑक्सिडंट तत्व आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊन शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here