असा बनवा चटपटीत दहिवडा; वाचा एका क्लिकवर

साधारणपणे चाट मसाला टाईप पदार्थ आपल्याला घरी बनवणे थोडे जड जाते. अगदी पाणी पुरीत नेमकं पाणी किती टाकायचं, इथपासून सुरुवात होते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला सर्वांचा आवडता असा दहिवडा घरच्या घरी दहिवडा कसा बनवावा हे सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो….

1) 2 वाट्या दही

2) 1 वाटी उडीद डाळ

3) 2 चमचे जिरे पावडर

4) गरजेपुरते लाल तिखट

5) बारीक चिरलेली हिरवी मिरची

6) तळायला तेल तर लागेलच की

आणि मीठ अर्थात चवीनुसार

कृती तर पाहा की…

1) उडीद डाळ भिजायला घाला. पाच- सहा तास भिजू द्या.

2) भिजून काढली की चांगली निथळून घ्या. मग त्यात हिरवी मीरची घालून तसेच थोडेसे पाणी टाकून मिक्सर मधून काढून घ्या.

3) पेस्ट जास्त बारीक करू नका. व जात मोठीही करू नका. मिक्सरमध्ये डाळ करताना सारखे चेक करा आणि मध्यम पेस्ट तयार करून घ्या.

4) मग मीठ घाला व मिक्स करून घ्या. 

5) तेल गरम करायला घ्या. मध्यम गॅसवर तेल गरम करा. 

6) तेल गरम झाल्यावर गॅस कमी करून कजात वडे तयार करून तळायला सोडा. 

7) वडे हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत.

8) मग एका वाटीत दही घेऊन त्यात मीठ टाका. मिक्स करा. 

9) आता वडा बाऊलमध्ये घेऊन त्यावर दही, लाल तिखट पावडर, जिरे पावडर, चिंचेची गोड चटणी आणि पुदिना चटणी घालून खाण्यास घ्यावे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here