आपल्या कृतीतून सुनंदा पवारांनी दाखवून दिले; वाचा, नेमकं काय केलं त्यांनी

अहमदनगर :

‘दुसऱ्याला ज्ञान देण्याआधी आपण कृती करून दाखवावी’, असे म्हणत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार स्वतः स्वच्छता मोहिमेत उतरल्या आहेत.

सुनंदा पवार यांनी केलेली फेसबुक पोस्ट जशी तशी :-

दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याआधी ती कृती आधी स्वतः आपल्या जीवनात अवलंबवावी अन्यथा शब्द व्यर्थ ठरतात. स्वच्छ कर्जत-जामखेड संदेश देतांनी मी सुद्धा कर्जत-जामखेडचा एक भाग आहे व त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. कोणत्याही ही कार्याची सुरुवात स्वतः पासून करायची असते, म्हणूनचं कर्जत येथे राहत्या घरासमोरील परिसर मी व माझ्या सहकार्यांनी काल साफ केले. यानंतर, दादा पाटील महाविद्यालयात NSS व NCCच्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. यानंतर, महात्मा गांधी विद्यालयातील छोट-छोट्या बालगोपालांसोबत चर्चा करून रोहीत दादा समवेत औषध विक्रेता संघ व विविध सामाजिक संघटनांशी आम्ही चर्चा केली. रोहित दादा त्यांच्या इतर मिटींगसाठी पुढे निघाले तर, मी पुन्हा महात्मा गांधी विद्यालयात जाऊन शिक्षकांशी संवाद साधला. मी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यास सर्व संघटना व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनीही ही हाकेला ओ देत मला सर्वच, संघटना व विद्यार्थ्यांनी सहमती दर्शवली.

संध्याकाळी, जन शिक्षण संस्था व कर्जत जामखेड इंटिग्रेटेड फौंडेशन अंतर्गत राशीन येथे शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यानंतर, मुक्ताई शॉपी यांची राशीन येथील शाखेचे उद्घाटन माझ्या व रोहितच्या हस्ते करण्यात आले. तसेच, बचतगटातील महिलांना कर्जाचे चेक ही वितरित करण्यात आले. यामुळे, राशीन येथील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील यात शंकाचं नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here