आक्रमक झालेल्या उदयनराजेंचा ईशारा; एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा…

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा समाजाच्या आरक्षणावरून अनेक घडामोडी घडत आहेत. विविधपक्षीय नेते आपापली भूमिका मांडत आहेत. राज्यातील विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत तर राज्य केंद्राकडे बोट दाखवत आहे. मराठा आरक्षणाबद्दल भूमिका मांडताना राजकीय नेते एकमेकांवर टीकाही करत आहेत. अशातच आलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठी क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. दरम्यान मराठा समाज आरक्षणावरून आक्रमक झालेले भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला घेतला नाही तर शासनाचे त्याचे परिणाम भोगावे लागतील’, असा गंभीर ईशारा सरकारला दिला आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? , असा सवालही त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका, असेही पुढे त्यांनी म्हटले आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here