मराठीच्या मुद्द्यावरून आठवलेंनी घेतली ‘ती’ भूमिका; उदयनराजेंबद्दल केलेले वक्तव्याचीबाबत म्हणाले…

मुंबई :

लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीबाबत घेतलेली भूमिकेवरुन अनेक वाद विवाद चालू आहेत. शोभा देशपांडे यांनी नंतर आंदोलन केले. पुढे मराठी एकीकरण समिती, मनसे आणि शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला याच पार्श्वभूमीवर ‘ फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी आहे. मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही’, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी घेतली. लेखिका शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी बोलताना आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या विधानाशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. सर्वांनाच डोकी आहेत म्हणून बिनडोक म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शाहू महाराज आणि आंबेडकर वंशजांनी वाद घालू नये. 

मात्र यावेळी त्यांनी उदयनराजेंनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाच्या विरुद्ध भूमिका घेतली. सर्व आरक्षण रद्द करण्याला माझा विरोध असल्याचे आठवले म्हणाले. अधिक बोलताना ते म्हणाले की, एमपीएससी परिक्षा झालीच पाहीजे. एससी आणि एसटी तरूण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. उर्वरित जागांवर मराठा समाजातील तरूण येतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here