मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसे दणका; ‘त्या’ विषयावरून मनसे पुन्हा आक्रमक

मुंबई :

मराठी न बोलणाऱ्या आणि आपले दुकानाचे अधिकृत लायसन्स न दाखवल्यामुळे गुजराती व्यापाऱ्याला मनसेने दणका दिला आहे. काल सोशल मिडीयावर लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेल्या आंदोलनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेत सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. मराठीजनांचा आग्रहापुढे अखेर गुजराती सराफ दुकानदाराने मराठीतून माफी मागत आपली चूक कबुल केली. 

नेमकं काय आहे प्रकरण :-

लेखिका शोभा देशपांडे या कुलाबा परिसरात असणाऱ्या  महावीर ज्वेलर्स येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दुकानदाराला मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. यावेळी दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देत शोभा देशपांडे यांचा अपमान केला. गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून शोभा देशपांडेंनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते.

शोभा देशपांडेनी आपली भूमिका ठाम ठेवली. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त स्वतः येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, ही भूमिका घेत त्यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले.

अखेरीस मराठी एकीकरण समिती नंतर मनसे आणि शिवसेनेने पुढे येऊन त्यांना पाठींबा दिला. दरम्यान दुकानदाराला मनसेने चोपल्याचेही माहिती मिळाली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here