माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘ही’ मोठी कंपनी करणार शेअरचे बायबॅक; वाचा, कसा होईल शेअर मार्केटवर परिणाम

मुंबई :

शेअर मार्केटमध्ये सध्या संधी असल्या तरीही रिस्क आहे, अशी एकूण परिस्थिती आहे. कोरोनाने एकून जगभरात अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना व्यवसाय आणि अर्थ जगतातून येणाऱ्या वार्तांचा चांगला-वाईट परिणाम शेअर मार्केटवर दिसत आहे. सर्व मार्केट सध्या अस्थिर अशा अवस्थेत असताना विप्रो कंपनीने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. विप्रो कंपनीही शेअरचे बायबॅक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

13 ऑक्‍टोबर रोजी विप्रो कंपनीचे संचालक मंडळ शेअरच्या बायबॅक संबंधीचा निर्णय जाहीर करणार आहे. तसेच या विषयीचा निर्णय संचालक मंडळ लवकरात लवकर घेणार असल्याचे कंपनीने शेअरबाजारांना कळविले आहे. कंपनीने या निर्णयाविषयी अधिक माहिती मात्र दिलेली नाही. इतर तपशील कंपनीने जाणीवपूर्वक उघड केलेला नाही.

शेअरबाजारांना लवकरच विप्रो कंपनीने घेतलेला निर्णय सांगितला जाईल. मात्र तोपर्यंत कुठलाही ईतर तपशील समोर आणला जाणार नाही. या बातमीने विप्रोच्या शेअरचे भाव वाढले आहेत. शेअरचे भाव 7.34 टक्‍क्‍यांनी वाढून 360 रुपयांवर गेले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here