राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला; रोहित पवारांचा ‘त्यांना’ टोला

अहमदनगर :

कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार’ झाला, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’, असे म्हणत टोला हाणला.

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना देवेंद्र फडणवीस साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात… कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय… पण आता येत्या GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.

पवार यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राजेश खालेकर यांनी म्हटले आहे की, या गोष्टी पेक्षा शिक्षक भरती,आरोग्य भरती,पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची आहे त्यावर वेळ खर्च करा आपण कोण काय बोलत हे महत्त्वाचे नाही निवडणुकीच्या वेळी तुम्ही काय आश्वासन दिले हे महत्त्वाचे आहे त्यावर कृती करा आम्हाला न्याय द्या.

सचिन जाधव यांनी म्हटले आहे की, दादा राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी नेते विरोध करत आहेत… तुम्ही काही बोलणार आहात की नाही मराठा समाजासाठी…

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here