चंद्रकांत पाटलांची खडसेंना साद; एकवेळ थोबाडीत मारा पण…

मुंबई :

भाजपात नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षबदलाच्या वावड्या गेल्या ५ वर्षांपासून उठत आहेत. दरम्यान गेल्या महिन्यापासून खडसेही असे पाऊल उचलू शकतात, अशी चिन्हे आहेत. खडसे वेगवेगळ्या कारणांनी पक्षावर नाराज आहेत. त्यांनी पक्षावर अनेकदा टीका केलेली आहे. गेल्या आठवड्यात खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे अनेक वृत्तवाहिन्या आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगत होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना साद घातली आहे.  एकवेळ चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यांसमोर (चॅनेल) जाऊ नका, अशी विनंती त्यांनी खडसेंना केली आहे.

पाटील म्हणाले की, ‘खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा चर्चा माध्यामांकडून होत आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत. खडसे आमचे समजूतदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका.      

अशी आहे पार्श्वभूमी :-

खडसे पक्षबदल करणार आहेत, अशी चिन्हे असताना खडसे बुधवारपासून मुबंईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे पक्षबदलाच्या चर्चेला वाव मिळाला आहे. असे असले तरी भाजपाच्या नवनियुक्ती राज्य कार्यकारणीची बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here