‘त्या’ बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार-अजित पवार यांच्याविरोधात ईडीची नायालयात धाव

मुंबई :

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनाही ‘क्लीन चिट’ दिली आहे. एकूण ७६ जणांना या घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ दिली असून यापैकी ५० जन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळचे आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचाही यात समावेश आहे. तर उरलेल्या काहींमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील तसेच शेकापचे जयंत पाटील अशा सहकार क्षेत्रातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाजूने या प्रकरणात कुठलाच गैरव्यवहार झाले नसल्याचे सांगत क्लोज रिपोर्ट सादर केला आहे. मात्र ईडीने याला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार शरद पवार यांचेही संशयित म्हणून नाव होते त्यामुळे यापूर्वी ईडीने त्यांची चौकशी केली होती. याप्रकरणी शरद पवार यांचे जबाब नोंदविले गेले. नंतर ईडीने या प्रकरणात जास्त लक्ष घातले नाही. हा तपास फाईलमध्येच पडून होता. आता मुंबई पोलिसांनी क्लोज रिपोर्ट दिल्यावर ईडीने यात लक्ष घातले आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी क्लिन चीट दिल्याने या तपासाला ईडीकडून आता पुन्हा वेग येण्याची चिन्हे आहेत. ईडीने या संभाव्य घोटाळा प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या एकूण नऊ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here