राज्य शिखर बँक घोटाळा: अजित पवारांसह भाजप, शिवसेनेच्या या नेत्यांनाही दिली ‘क्लीन चिट’

मुंबई :

महाराष्ट्रात गाजलेल्या एका कथित घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनाही ‘क्लीन चिट’ दिली आहे. एकूण ७६ जणांना या घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळयावरून एकेकाळी मोठे वादळ उठले होते. नंतर हे प्रकरणावरून अजित पवारांवर टीका करण्यात आली. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला. अजित पवार त्यावेळी या बँकेचे संचालक होते. त्यावेळी तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या अगदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जबाब नोंदविले गेले. अखेरीस एकूण ७६ जणांना या प्रकरणात क्लिनचीट देण्यात आली आहे.

यात उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील तसेच शेकापचे जयंत पाटील अशा सहकार क्षेत्रातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here