‘फोर्ब्स’ने ‘टॉप 100’ श्रीमंत केले घोषित; कोरोनाची लस बनवणाऱ्या ‘त्या’ भारतीय व्यक्तीपासून तर अंबानीपर्यंत, वाचा कोण आहे कोणत्या स्थानावर

मुंबई :

भारतातील पहिल्या श्रीमंत १०० लोकांची यादी फोर्ब्स मॅगझिनने नुकतीच जाहीर केली. श्रीमंतांच्या यादीत सातत्याने आपले स्थान कायम राखणारे रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यावर्षीही पहिल्याच क्रमांकावर आहेत. सातत्याने १३ वर्षे या यादीत मुकेश अंबानी प्रथम स्थानी आहेत. कोरोनाच्या लसीवर काम करणारे सिरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पूनावाला हे यादीत पहिल्या दहात आहेत. पूनावाला यांनी पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. सायरस पूनावाला यांच्या संपत्तीतही मोठी वाढ होत आहे. पुनावालांची संपत्ती 11.5 अब्ज डॉलर इतकी झाली असल्यामुळे त्यांनी थेट टॉप 10मध्ये धडक मारली आणि सहाव्या स्थान मिळवले.

दुसऱ्या स्थानावर 25.2 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले गौतम अदानी आहेत तर 20. 4 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले शिव नाडर हे तिसऱ्या स्थानी आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, पहिल्या 100 च्या यादीतील हिंदुस्थानींनी एकूण 517.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे. डी-मार्ट चे राधाकृष्ण दमाणी, कोटक समूहाचे उदय कोटक, हिंदुजा ब्रदर्स, पालोनजी मेस्री, लक्ष्मी मित्तल, गोदरेज परिवार हे सर्व पहिल्या दहात आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here