MPSC परीक्षा स्थगित न केल्यास उधळून लावणार; पहा खासदार संभाजीराजे यांनी काय दिलाय इशारा

मराठा आरक्षणाचा मुद्दा तप्त असतानाच आता राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपचे खासदार  छत्रपती संभाजीराजे संतप्त झालेले आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये आणि रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा स्थगित करण्यात यावी, जर ही परीक्षा स्थगित झाली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, परीक्षा उधळून लावण्यात येईल.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, मराठा समाजाचा विरोध ढावलून ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून झाला तर राज्यभरातील सर्वच पेंद्राबाहेर तीव्र आंदोलन छेडून ही परीक्षा उधळून लावण्यात येईल. यावेळी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील जिल्हा समन्वयक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणावर अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच करोनामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या काही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनाही परीक्षा केंद्रावर येता येणार नाही. नुकत्याच झालेल्या पेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहिले. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने ही परीक्षा स्थगित करून पुढे ढकलावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here