आली की भन्नाट इलेक्ट्रिक सुपरकार; पहा तिचे फीचर्स आणि किंमत यांची माहिती

अलिशान कार म्हटले की भारतीयांना एकाच ब्रांड आठवतो. तो म्हणजे मर्सिडीज. होय, बहुसंख्य भारतीयांचे या कंपनीची कार घेण्याचे स्वप्न असते. काहींचे पूर्ण होते, तर काहींना नाही त्यात यश येत. त्याच मर्सिडीज कंपनीने आता भन्नाट इलेक्ट्रिक सुपरकार आणली आहे.

होय, पेट्रोल-डीझेल यांची झंझट नाही ठेवली त्यांनीही आता. कंपनीने इलेक्ट्रिक SUV मॉडल EQC भारतात लॉन्च केले आहे. या कारची अनेकजण वाट पाहत होते. कारण, देशात पेट्रोल-डीझेल यावर वाढलेला कर आणि त्यामुळे महाग झालेला प्रवास यामुळे अनेकांना आता इलेक्ट्रिक वाहने आपलीशी वाटत आहेत. अशावेळी अनेक कंपन्यांनी कमी किमतीत बाईक व कार आणून फसवायलाही सुरुवात केली आहे. अशावेळी विश्वासार्ह कंपनीची कार म्हणून पुन्हा एकदा मर्सिडीजकडे पहिले जाते. मात्र, ती कार काही सामान्य माणसांच्या आवाक्यात अन्ही हा..!

मर्सिडीज इलेक्ट्रिक SUV मॉडल EQC याचे फीचर्स :

 1. चार्जिंगसाठीचा वेळ : २१ तास (15A डॉमेस्टिक पावर सप्लाई)
 2.  फास्ट चार्जर जोडून (110kW DC) ९० मिनिटात होणार फुल चार्ज
 3. वॉल बॉक्स चार्जर (7.5kW) यांच्या मदतीने १० तासात चार्जिंग
 4. एकदा चार्जिंग केल्यावर  445-471 km जाणार
 5.  पावर कंजम्प्शन : 20.8-19.7 kWh/100 km
 6. दोन इलेक्ट्रिक मोटर्समुळे कंबाइंड आउटपुट 408hp
 7. फ़क़्त 5.1 सेकेंड्समध्ये 0-100 km/hr इतका स्पीड पकडते
 8. टॉप स्पीड 180kmph
 9. 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
 10. MBUX ऑपरेटिंग सिस्टम 
 11. अनलॉक करण्यासाठी बायोमेट्रिक ID एक्सेस
 12. एंटी थेफ्ट अलार्म सिस्टम
 13. Mercedes me’ कनेक्ट फीचरद्वारे अॅप्लिकेशनला कनेक्ट होणार
 14. अनलिमिटेड ऑन रोड असिस्टेंस
 15. कॉम्प्रिहैन्सिव सर्विस पैकेज 5 वर्षे
 16. अनलिमिटेड किमी एक्सटेंडेड वॉरंटी 5 वर्षे
 17. बॅटरी कव्हर 8 साल/1.60 लाख किमी
 18. या शहरात भेटणार कार : दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगलुरु, हैदराबाद आणि चेन्नई 
 19. एसी वॉल बॉक्स चार्जर आणि होम इलेक्ट्रिकल चार्जर
 20. किंमंत : 99.30 लाख रुपये

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here