म्हणून अंबानी-अदानी टॉपवर; पहा देशातील श्रीमंतांची यादी, अनेकांना या दोघांनी दिलाय झटका

देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्वाचा हातभार लावणारे प्रमुख उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची ओळख पक्की झालेली आहे. त्या दोघांनीही मोठ्या कष्टाने आणि कल्पकतेच्या जोरावर भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे. प्रथम स्थानावर अंबानी, तर दुसऱ्या स्थानावर अदानी यांनी आपली पकड मजबूत केली आहे.

जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने यंदाची भारतीय श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात या दोन्ही दिग्गज उद्योगपतींनी अनेक गर्भश्रीमंत व्यक्तींना मागे टाकण्याची किमया केली आहे. सलग तेराव्या वर्षी या यादीत अग्रस्थानी फ़क़्त मुकेश अंबानी आहेत. त्यानंतर आता यापुढील काळात या यादीत कायम राहण्याच्या उद्देशाने अदानी यांनीही आपले स्थान बळकट करून घेतले आहे.

जगभरात सध्या अंबानींच्या रिलायन्स कंपनीचा बोलबाला आहे. त्यांनी गुगल, फेसबुक यांच्यासह अनेक अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक मिळवून जगातील क्रमांक एकाचा श्रीमंत व्यक्ती होण्याकडे वाटचाल केली आहे. भारतीय उद्योजक म्हणून हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तर, अदानी यांच्या ग्रुपने शेती आणि इतर क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरू केली आहे.

भारतातील श्रीमंतांची यादी अशी (आकडेवारी डॉलरमध्ये) :

  1. मुकेश अंबानी (रिलायन्स समूह) $ 517.5 अब्ज
  2. गौतम अदानी (अदानी समूह) $ 25.2 अब्ज
  3. शिव नाडर (एचसीएल टेक्नोलॉजीज) $ 20.4 अब्ज
  4. राधाकिशन दमानी (डी-मार्ट) $ 15.4 अब्ज
  5. हिंदुजा बंधु (हिंदुजा ग्रुप) $12.8 अब्ज
  6. सायरस पूनावाला $ 11.5 अब्ज
  7. पालोनजी मिस्त्री $ 11.4 अब्ज
  8. उदय कोटक $ 11.3 अब्ज
  9. गोदरेज परिवार $ 11 अब्ज
  10. लक्ष्मी मित्तल $ 10.3 अब्ज

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here