म्हणून अंबानींच्या ‘फ्युचर’ला बसला झटका; अमेझॉनच्या नोटीसचे प्रकरण वाचा

फ्युचर ग्रुपमधील रिटेलिंगचा हिस्सा ताब्यात घेऊन सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जोरदार घोडदौड सुरू केली आहे. जिओ मोबाइल सेवेसह किराणा क्षेत्रात मोनोपॉली करायला अंबानी सरसावले आहेत. त्याचवेळी जगातील बलाढ्य कंपनी असलेल्या अमेझॉनने फ्युचर ग्रुपला नोटीस पाठवली आहे.

यामुळे नेमका काय फरक पडेल हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, हे प्रकरण सामोपचाराने मिटवायला आता फ्युचर ग्रुप सरसावला आहे. फ्युचर ग्रुपच्या फ्यूचर कूपन्स यांच्याशी अमेझॉन कंपनीचा करार आहे. त्यामधील ‘नॉ कंपीट लाइक पैक्ट’ याचे उल्लंघन झाल्याचा दावा अमेझॉनने केला आहे. तशी नोटीस त्यांनी ‘फ्युचर’ला पाठवली आहे.

फ्युचर ग्रुपने रिटेल डिव्हिजनमधील बिग बाजार, एफबीबी, ईजीडे यांची विक्री  24,713 कोटी रुपयांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या रिलायंस रिटेल वेंचर लिमिटेड (RRVL) यांना केली आहे. त्यासाठी आपल्या रिटेलिंग विभागाच्या छोट्या-मोठ्या कंपन्यांचे विलीनीकरण फ्युचर ग्रुप हा फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (FEL) यामध्ये करीत आहे. त्याचवेळी ही नोटीस आलेली आहे.

किमान 3 वर्षे यानंतर आणि 10 वर्षांच्या आत अमेझॉन कंपनी फ्युचरमध्ये गुंतवणूक करू शकते असे फ्यूचर कूपन्स यांच्याशी करार करताना ठरले होते. 49 टक्के त्याच बेसिसवर अमेझॉनने घेतले होते. त्यात इतर स्पर्धक कंपन्यांशी कोणताही करार किंवा व्यवहार न करण्याचे फ्युचर ग्रुपने मान्य केले होते. त्याच कराराचा भंग झाल्याचे आता अमेझॉनचे म्हणणे आहे.

सध्या बाजारात रिलायन्स कंपनीने अमेझॉन आणि इतर रिटेलिंग कंपन्यांना लक्ष्य केले आहे. भारतीय कंपनी असल्याने सरकारी नियमावली आणि आर्थिक ताकदीच्या जीवावर अंबानींनी या क्षेत्रात आपली मोनोपॉलीकरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासह अनेक स्पर्धक कंपन्यांना ताकद लावावी लागत आहे. त्याचवेळी हे प्रकरण पुढे आले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here