म्हणून राहुल गांधींनी केला मोदींवर हल्लाबोल; ‘त्या’ पैशात सैनिकांसाठी ‘इतक्या’ गोष्टी खरेदी केल्या असत्या…

अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेदी केलेल्या ८४०० कोटींच्या विमानाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावरून मोदींवर समाजमाध्यमांमध्ये टीकाही करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वतःसाठी ८४०० कोटींचे विमान खरेदी केले. एवढ्या पैशात सियाचिन-लद्दाख़ सीमेवर असणाऱ्या सैनिकांसाठी अनेक गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. पुढे राहुल यांनी थेट यादी आणि संख्याच देत सर्वाना चकित केले.  

  1. गरम कपड़े: 30,00,000
  2. जैकेट, दस्ताने: 60,00,000
  3. जूते: 67,20,000
  4. ऑक्सिजन सिलेंडर: 16,80,000

पुढे राहुल यांनी ट्वीट म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या इमेजची चिंता आहे परंतु आपल्या सैनिकांची नाही. राहुल गांधी हे सातत्याने पंतप्रधान मोदींच्या कामावरून त्यांना लक्ष्य करत असतात तसेच अनेक गंभीर मुद्देही समोर आणत असतात. मात्र अनेकदा मोदी आणि केंद्र सरकारला राहुल गांधींच्या प्रश्नांना आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांना गांभीर्याने न घेतल्यामुळे अनेक तोट्यांना सामोरे जावे लागले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here