शरद पवारांची बिहारवरही स्वारी; पहा काय नियोजन केलेय निवडणुकीचे त्यांनी

शरद पवार म्हणजे भारतीय राजकारणातील एक दंतकथा. प्रमुख पदावर न जाऊनही सातत्याने आपला ठसा उमटविण्यात त्यांनी यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील आपला दबदबा कायम राखणाऱ्या पवार यांनी आता थेट बिहारवर स्वारी करण्याची तयारी केली आहे.

त्यासाठी बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध केली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हेच असून इतर ४० जणांची यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा या यादीत समावेश आहे.

पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, बिहारमध्ये आपला ठसा उमटविण्यात पवारांचा हा पक्ष कितपत यश मिळवतो त्याकडे देशाचे लक्ष असेल.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here