प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका; एक राजा बिनडोक तर दुसरे…

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून अनेक वाद-विवाद चालू आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंवर टीका केली आहे. ‘एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत’, असे म्हणत त्यांनी दोन्ही राजांवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही राजेंवर जळजळीत टीका करत मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी उदयनराजेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. ‘ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे’, असेही ते म्हणाले.

मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आंदोलनाला पाठींबा द्यावा, अशी मागणी केली असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here