दुपारची झोप घ्यायला आवडते; सामोरे जावे लागेल ‘या’ दुष्परिणामांना

अनेकांना दुपारी जेवण झाले की थोडा वेळ अंग टाकून द्यायला आवडते. शहरातील काही लोकांना तर दुपारचे झोपण्याची सवय झाली आहे. आजपर्यंत तुम्ही दुपारी झोपण्याचे फायदे वाचले असतील. पण तोटे मावाचले नसतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दुपारी झोपण्याची सवय आरोग्यासाठी कशी अपायकारक आहे, हे सांगणार आहोत.

  • दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाच्या समस्या उद्भवतात.
  • दुपारच्या झोपेमुळे शरिरात फॅट वाढते परिणामी वजन वाढते.
  • दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. परिणामी जखम वाढू शकते.
  • कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते.  
  • रक्त दूषित होण्याची शक्यता असते. 
  • एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार उद्भवतात.
  • दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारी झोपणे टाळावे.
  • संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here